Posts

Showing posts from September, 2014

आमदार गणपतराव देशमुख हे 100 नंबरी सोने- हाजी शब्बीरभाई खतीब

Image
आमदार गणपतराव देशमुख हे 100 नंबरी सोने- हाजी शब्बीरभाई खतीब  सांगोला (प्रतिनिधी) :- मी देशमुख साहेबांचा गेल्या 40 वर्षांपासून समर्थक आहे. सांगोला शहर आणि तालुक्याचा चौफेर विकास केवळ आमदार गणपतराव देशमुख यांच्यामुळेच झाला आहे. दूरदृष्टीने आम. देशमुख यांनी पंढरपूरहून चंद्रभागेचे पाणी आणून सांगोला शहराची तहान भागविली आहे. शेतीच्या पाण्याचे आम. देशमुख यांचे स्वप्न 50 टक्के पूर्ण झाले आहे. बांधावर आलेले शेतीचे पाणी शेतात नेण्याचे नियोजन त्यांचे आहे. त्यासाठी आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. सांगोला शहरात 100 पेक्षा जास्त ज्वेलर्स दुकाने आहेत. शहराचा शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे. उद्योगधंदे मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. 40 टक़्केपेक्षा जास्त लोक तालुक्याबाहेरील उद्योगधंदा, नोकरीच्या निमित्ताने शहरात स्थायिक आहेत. याचे कारण शहराचा चौफेर विकास व शहरात असलेली शांतता. आम. देशमुख यांनी सर्वधर्मसमभाव राबविला. सांगोला शहराच्या शांततेचा पाया आम. देशमुख यांनी घातला. त्यामुळे रुपनर बंधूनी आपले उद्योग सुरु केले. चुक करणाराची बाजू आम. देशमुख यांनी कधीही ...

आमदार गणपतराव देशमुख यांचा अर्ज दाखल

Image
आमदार गणपतराव देशमुख यांचा अर्ज दाखल सांगोला दि. 26 (प्रतिनिधी) :- सांगोला विधानसभा मतदारसंघासाठी आज शुक्रवारी विद्यमान आमदार गणपतराव देशमुख यांनी शेकापक्षाकडून अर्ज दाखल केला. शुक्रवारी दुपारी 12 वाजून 40 मिनिटांनी आमदार गणपतराव देशमुख आपल्या कार्यकर्त्यांसमवेत तहसील कार्यालयात आले आणि 1 वाजण्याच्या सुमारास त्यांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले. त्यांच्यासमवेत उद्योजक भाऊसाहेब रुपनर, मारुतीआबा बनकर, विठ्ठलराव शिंदे, चंद्रकांतदादा देशमुख, बाळासाहेब काटकर आदी उपस्थित होते.

शहराचा विकास हेच ध्येय ठेऊन सातत्याने काम-आ.देशमुखसांगोला शहरात विविध ठिकाणी प्रचार सभा संपन्न

Image
शहराचा विकास हेच ध्येय ठेऊन सातत्याने काम-आ.देशमुखसांगोला शहरात विविध ठिकाणी प्रचार सभा संपन्न सांंगोला (अमेय मस्के) :-सांगोला शहरात पंढरपूरचे पाणीआल्यापासून आणि सुतगिरणीसुरू झाल्यापासून शहराचीझपाट्याने वाढ होत आहे. पूर्वीयेथील लोक कामासाठीबाहेरगावी जात होते.अलीकडच्या काळात मात्रबाहेरगावचे लोकच या ठिकाणीयेत आहेत. बाहेरगावच्याविद्यार्थ्यांची संख्या, ज्वेलर्सदुकानदार, व्यापारी आदींची संख्यावाढत आहे. हे सहजासहजी घडलेनाही. शहराचा विकास हेच ध्येयठेवून सातत्याने काम केलेअसल्यानेच शहराचे स्वरूपबदललेले आहे. सध्याचा काळहा शहराच्या भरभराटीचा काळआहे, असे प्रतिपादन आमदारगणपतराव देशमुख यांनी केले.विधानसभा निवडणूकीच्यानिमित्ताने आ.गणपतराव देशमुखयांच्या काल गुरूवारीसायंकाळच्या सुारास भिमनगर,तेली गल्ली, कुंभार गल्ली, कोष्टीगल्ली आदि शहराच्या विविधभागात प्रचार सभा घेण्यात आल्या.यावेळी उपस्थितांसमोर आपलेविचार व्यक्त करतानाआ.गणपतराव देशमुख बोलत होते.आ.गणपतराव देशमुख यांनी50 वर्षात काय केले असा विरोधकसातत्याने प्रश्न विचारतात असेसांगताना आ.गणपतराव देशमुखम्हणाले, मागच्या 5 वर्षात कायकेले असा प्रश्न उपस...

आमदार गणपतराव देशमुख यांच्या सांगोला शहरात विविध भागात प्रचार सभा संपन्न; सभेस उत्स्फुर्त प्रतिसाद

Image
आमदार गणपतराव देशमुख यांच्या सांगोला शहरात विविध भागात प्रचार सभा संपन्न; सभेस उत्स्फुर्त प्रतिसाद सांगोला (अमेय मस्के):-निवडणुकीच्या कारणावरूनशहरामध्ये तणाव निर्माण होऊनये, कटूता राहू नये, शांततामयवातावरण रहावे आणि शहराचाविकास व्हावा, या उद्देशानेशेकाप, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसपक्षाने एकत्रीत येऊन निवडणूकलढविली, असे विचारआ.गणपतराव देशमुख यांनीव्यक्त केले.विधानसभा निवडणुकीच्यानिमित्ताने आ.गणपतराव देशमुखयांचा काल सांगोला शहरातीलवंदेातरम चौक, राऊत मळा,दत्तनगर, मुजावर गल्ली येथे प्रचारदौरा आयोजीत करण्यात आलाहोता. यावेळी आ.गणपतरावदेशमुख बोलत होते.सांगोला शहरात शांततामयवातावरण, सुरक्षितता,लोकशाहीचे वातावरण आणिदंगा मस्ती करणार्‍यांना वगुन्हेगारी प्रवृत्तीला थारा न देणेअशा सर्व वातावरणात विकासचांगल्या पध्दतीने होतो, असेसांगताना आ.देशमुख पुढेम्हणाले, सांगोला शहराचासर्वांगीण होत असलेला विकास,पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठाआणि शांततामय वातावरण यासर्व गोष्टींमुळे, आसपासच्यागावातील, परिसरातील व्यापारी,नोकरदार, सेवानिवृत्त कर्मचारी-अधिकारी राहण्यासाठी सांगोलेशहराला प्राधान्य देतात.शहराप्रमाणेच शहरा...

लक्ष्मीनगर येथील 25 युवक कार्यकर्त्यांचा शेकापक्षात प्रवेश

Image
लक्ष्मीनगर येथील 25 युवक कार्यकर्त्यांचा शेकापक्षात प्रवेश सांगोला (प्रतिनिधी):- सांगोला मतदार संघाचा विकास करण्याची क्षमता फक्त आ.गणपतराव देशमुख यांच्यामध्येच असून त्यांच्यामुळेच आपल्या जीवनाचा उत्कर्ष होईल. याची जाणीव झालेल्या लक्ष्मीनगर ता.सांगोला येथील 25 युवकांनी काल आ.गणपतराव देशमुख यांच्या निवासस्थानी भेट घेऊन शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश केला. प्रथमच मतदानाचा अधिकार प्राप्त झालेल्या या सुशिक्षीत युवकांनी आ.गणपतराव देशमुख यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन हा निर्णय घेतला आहे. यावेळी लक्ष्मीनगरचे माजी सरपंच औदुंबर नरळे, सरपंच सिध्देश्वर करांडे, सोसायटीचे व्हा.चेअरमन बसवेश्वर कावळे, पुरोगामी युवक संघटनेचे उपाध्यक्ष धनाजी नरळे, माजी उपसरपंच भारत नरळे, उद्योगपती नितिन नरळे, बालाजी नरळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी युवा नेते चंद्रकांत देशमुख, माजी नगराध्यक्ष मारूतीआबा बनकर, माजी जि.प.सदस्य बाबासाहेब करांडे, जिल्हा परिषद सदस्य अशोकराव शिंदे, बाळासाहेब एरंडे यांच्यासह अनेक शेकापक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

आ.गणपतराव देशमुख यांचा आजतालुक्यात विविध गावात गावभेट दौरा

Image
आ.गणपतराव देशमुख यांचा आजतालुक्यात विविध गावात गावभेट दौरा सांगोला (प्रतिनिधी) :-आमदार गणपतराव देशमुख यांचाआज सांगोला तालुक्यातील विविधगावामध्ये प्रचार दौरा आयोजितकेला असल्याची माहितीशे.का.पक्षाचे तालुका चिटणीस भाईविठ्ठलराव शिंदे यांनी दिली.आज मंगळवार दि.23 सप्टेंबररोजी दुपारी 12.30 वाजता उदनवाडी येथे, दुपारी2.30 वाजता य.मंगेवाडी येथे दौरा आयोजितकरण्यात आला आहे. सायं.5 वाजतायेडगेवाडी नं.2 येथे, सायं.6.30वाजता खिलारवाडी येथे, तर रात्री 8वाजता गायगव्हाण येथे प्रचार दौराहोणार आहे.तरी वरील सर्व गावातील वपरिसरातील पदाधिकारी, कार्यकर्ते वग्रामस्थांनी वेळेवर उपस्थित रहावे,अशी विनंती शे.का.पक्षाच्यावतीने करण्यात आलीआहे.

कार्यकर्त्यांना सन्मानाने वागणूक दिली जाईल - आम. गणपतराव देशमुख

Image
कार्यकर्त्यांना सन्मानाने वागणूक दिली जाईल  - आम. गणपतराव देशमुख नाझरे :- आज वझरेगावातील ज्या कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी शेतकरीकामगार पक्षात प्रवेश केला आहे त्या सर्वांनापक्षाच्या कार्यकर्त्यांकडून सन्मानाची वागणूकदिली जाईल, असे आश्वासन आ.गणपतरावदेशमुख यांनी दिले. वझरे येथे गाव भेटी व प्रचार सभेमध्येआमदार गणपतराव देशमुख यांच्या नेतृत्वावरविश्वास ठेवून वझरे येथील युवा नेते महेशवाघमारे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शेतकरीकामगार पक्षात प्रवेश केला. त्यांच्या सोबतगणेश वाघमारे, अर्जुन वाघमारे, लक्ष्मण वाघमारे,सोमनाथ वाघमारे, नवनाथ वाघमारे, भिमराववाघमारे, संतोष वाघमारे, पांडुरंग वाघमारे व शंकरसाळुंखे यांच्यासह इतर 54 जणांनी शेतकरीकामगार पक्षात प्रवेश केला.सदर कार्यक्रमास युवा नेते चंद्रकांतदादादेशमुख, सुतगिरणीचे चेअरमन प्रा.नानासोालिगाडे, उपसभापती सुनिल चौगुले, नगराध्यक्षनवनाथभाऊ पवार, जि.प.सदस्या विमल बंडगर,सरपंच सौ.वाघमारे, संजय गांधी निराधार योजनेचेअध्यक्ष हणमंत बंडगर सर, प्रा.सुब्राव बंडगर सर,मा.सरपंच पिंटू बंडगर, नाझरेचे माजी सरपंचशामराव वाघमारे, ग्रा.पं.सदस्य बाळासाहेबवाघ...

आमदार गणपतराव देशमुख यांना सामाजिक बांधिलकी समजून पुरोगामी शिक्षक व सेवकसमितीच्या वतीने पाठींबा द्यावा -विनायक कुलकर्णी

 आमदार गणपतराव देशमुख यांना  सामाजिक बांधिलकी समजून पुरोगामी शिक्षक व सेवकसमितीच्या वतीने पाठींबा द्यावा -विनायक कुलकर्णी सांगोला दि. 20 (प्रतिनिधी):- समाजकारण करतानाभेदभाव नाही, विरोधकांना चांगल्याकामात सहकार्य, स्वत:च्या संस्थान काढता गावोगावच्याकार्यकर्त्यांना संस्था काढण्यासाठी सहकार्य, वयाच्या 88 व्या वर्षीसुध्दा गोरगरीब जनतेसाठीदिवसातील 18-18 तास कामकरणारे, अंधारात प्रकाश देणारा दिवा म्हणून राज्यात ज्यांच्याकडेपाहिले जाते, अशा निष्कलंक,चारित्र्यसंपन्न नेतृत्व असणार्‍याआमदार गणपतराव देशमुख यांनाआपली सामाजिक बांधिलकीसमजून पुरोगामी शिक्षक व सेवकसमितीच्यावतीने पाठींबा द्यावा,असे आवाहन पुरोगामी समितीचेकार्यकारिणी सदस्य विनायककुलकर्णी यांनी केले.शैक्षणिक क्षेत्रातील सर्वघटकांना सातत्याने सहकार्य करणारे,त्यांच्या अडीअडचणी सोडविणारेआ.गणपतराव देशमुख यांनापाठींबा देण्यासाठी पुरोगामीशिक्षक व सेवक समिती सांगोलायांच्यावतीने तालुक्यातीलशिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,संस्था चालक, सदस्या आदींचास्नेहमेळावा काल शनिवारीसांगोला येथे पार पडला. यावेळीउपस्थितांना मार्गदर्शन करतानाश्री.विनायक कुल...

आ.गणपतराव देशमुख यांचा आज अनकढाळ भागात, तर सोमवारी चोपडी भागात दौरा

Image
आ.गणपतराव देशमुख यांचा आज अनकढाळ भागात,  तर सोमवारी चोपडी भागात दौरा सांगोला (प्रतिनिधी) :-आमदार गणपतराव देशमुख यांचाआज सांगोला तालुक्यातील विविधगावात प्रचार दौरा आयोजित केलाअसल्याची माहिती शे.का.पक्षाचेतालुका चिटणीस भाई विठ्ठलरावशिंदे यांनी दिली.आज शनिवार दि.20 सप्टेंबररोजी सकाळी 10 वाजताअनकढाळ येथे, सकाळी 11वाजता राजुरी येथे दौरा आयोजितकरण्यात आलाआहे. दुपारी12.30 वाजताकारंडेवाडी येथे,दुपारी 1.30व ा ज त ाझापाचीवाडीयेथे, तरस ा य ं . 5 . 3 0वाजता बंडगरवाडी (चोपडी) येथेप्रचार दौरा होणार आहे.प र व ासो वार दि.22सप्टेंबर रोजीसकाळी 11वाजता चिणकेयेथे, दुपारी12.30 वाजतावझरे येथे, दुपारी2 वाजताधायगुडेवस्ती (बलवडी) येथे,दुपारी 3.30 वाजता बलवडी येथेदौरा आयोजित केला आहे. सायं.5वाजता चोपडी येथे, सायं.6.30वाजता उदनवाडी येथे, तर रात्री 8वाजता वाटंबरे येथे दौरा आयोजितकरण्यात आला आहे.तरी वरील सर्व गावातील वपरिसरातील पदाधिकारी, कार्यकर्तेव ग्रामस्थांनी वेळेवर उपस्थितरहावे, अशी विनंतीशे.का.पक्षाच्यावतीने करण्यातआली आहे.

लोकप्रतिनिधी काय करतो हे जनता दोन्ही डोळ्यांनी पहात असते - आ. देशमुख ---भाळवणी गटात आमदार गणपतराव देशमुख यांचा दौरा संपन्न

Image
लोकप्रतिनिधी काय करतो हे जनता दोन्ही डोळ्यांनी पहात असते - आ. देशमुख भाळवणी गटात आमदार गणपतराव देशमुख यांचा दौरा संपन्न  भाळवणी (अमेय मस्के) :-आपला लोकप्रतिनिधी काय करतोहे दोन्ही डोळे उघडे ठेवून जनतापहात असते. गेल्या 50 वर्षाध्येजनतेच्या प्रश्र्नांची बाजू घेऊन कामकरीत आहे. त्यांच्यासाठी अजूनवाटचाल सुरू आहे. जनता शहाणीआहे. जनता बोलत नसली तरी दोनडोळ्यांच्या कॅमेराने नेहमी पहातअसते. त्यामुळे मी कायविकासकामे केली हे सांगण्याचीगरज नाही. राहिलेली अपुर्ण कामेपुढच्या 5 वर्षात केली जातील.गेल्या 5 वर्षात केलेल्या कामामुळेशे.का.पक्षाला मतदान करा, अशीविनंती आ.गणपतराव देशमुखयांनी काल शुक्रवारी सांगोलाविधानसभा मतदार संघातीलभाळवणी गटातील विविध गावच्याआयोजीत केलेल्या गावभेटीच्याप्रचारदौर्‍यात केली.विधानसभेच्या निवडणुकीच्यानिमित्ताने आ.गणपतराव देशमुखयांनी काल शुक्रवारी दिवसभरभाळवणी गटातील गार्डी,लोणारवाडी, पळशी, सुपली, उपरी,जैनवाडी आणि रात्री भाळवणी येथेप्रचार दौरा व जनतेच्या गाठीभेटीघेतल्या. यावेळी गावोगावी पारपडलेल्या सभेत आमदार गणपतरावदेशमुख बोलत होते.आ.गणपतराव देशमुख यांचेगावोगावी प्रचंड ...

आमदार गणपतराव देशमुख यांचा पंढरपूर तालुक्यातील गावांत प्रचार दौरा - शुक्रवार दि. 19 सप्टेंबर 2014 - सकाळी 9.30 ते 11 गार्डी, 11 ते 12.30 लोणारवाडी, 12.30 ते 2.00 पळशी, 2.00 ते 3.00 सुपली, 3.00 ते 5.00 उपरी, सायंकाळी 5.30 ते 7.00 जैनवाडी, सायंकाळी 7.00 ते 10.00 भाळवणी (सभा)

Image
आमदार गणपतराव देशमुख यांचा पंढरपूर  तालुक्यातील गावांत प्रचार दौरा   -  शुक्रवार दि. 19 सप्टेंबर 2014 - सकाळी 9.30 ते 11 गार्डी, 11 ते 12.30 लोणारवाडी, 12.30 ते 2.00 पळशी, 2.00 ते 3.00 सुपली, 3.00 ते 5.00 उपरी, सायंकाळी 5.30 ते 7.00 जैनवाडी, सायंकाळी 7.00 ते 10.00 भाळवणी (सभा)

ग्रामीण भागातील शेतकर्‍यांचा विकास झाला पाहिजे- आमदार देशमुख

Image
ग्रामीण भागातील शेतकर्‍यांचा विकास झाला पाहिजे- आमदार देशमुख  सांगोला (प्रतिनिधी) :- शेकापक्ष हा कष्टकरी, शेतमजूर, दलित, बारा बलुतेदार, लहान व्यापारी, शेतकरी यांची बाजू घेणारा पक्ष आहे, ग्रामीण भागामध्ये दोन तृतीयांश जनता राहते. ग्रामीण भागातील शेतकर्‍यांच्या विकास झाल्याशिवाय देशाची प्रगती होणार नाही. गेली 50 वर्षे ग्रामीण भागाचे प्रश्न घेवूनच काम केले. शेतकर्‍यांच्या शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे त्याचप्रमाणे कष्टकरी जनतेच्या मागण्यासाठी मोर्चे, आंदोलने, चळवळी केल्या. शेेेेेतकर्‍यांना 2000 रुपये पेन्शन मिळाली पाहिजे अशी आपली मागणी आहे. असे विचार शेकापचे ज्येष्ठे नेते आमदार गणपतराव देशमुख यांनी व्यक्त केले. सांगोला तालुक्यातील आगलावेवाडी, भोपसेवाडी, डिकसळ, पारे, गावडेवाडी आणि तरंगेवाडी या गावच्या गावभेटीदरम्यान ग्रामस्थांबरोबर चर्चा करताना आम. देशमुख बोलत होते. याप्रसंगी आम. देशमुख म्हणाले की, 1962 पासून मला 52 वर्षे निवडून दिले आहे. 10 वेळा आमदार केले आहे, मंत्री केले आहे. यावेळी तुम्हीच मला उभे केले आहे. कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे मी निवडणूक लढवित आहे. ही शेवटी मह...

फेसबुक, व्हॉट्‌सऍपवरआ.गणपतराव देशमुख यांचाप्रचार लयभारी

Image
फेसबुक, व्हॉट्‌सऍपवरआ.गणपतराव देशमुख यांचाप्रचार लयभारी सांगोला  :- विधानसभानिवडणुकीची घोषणा निवडणुकआयोगाने केली असूननिवडणूकांचे बिगुल वाजलेअसताना सोशल मिडीयातील फेसबुक, व्हॉट्‌सऍपवरआ.गणपतराव देशमुख यांचाप्रचार लयभारी व जोरदार असूनयामध्ये सांगोला तालुक्यातीलयुवक वर्गाचा मोठा पाठींबाआ.देशमुख यांना असल्याचे चित्रसध्या दिसून येत आहे. प्रत्येकतरूणाने आपापल्या पध्दतीनेदररोज काहीतरी आ.देशमुखयांच्या संदर्भातील मजकूर,क्लिप, केलेली विकास कामेसोशल मिडीयावर अपडेट करण्याचेकाम चालु केले आहे. यामुळेशेकापक्षाचे कार्यकर्ते जोमातअसल्याचे फेसबुकवापरकर्त्यांधून बोलले जात आहे.थेट जनसंपर्कहा निवडणुकि ंज क  ण् य ा च ाहमखास फंडामानला जातो.त्यामुळे निवडणुक काळातउमेदवार पायाला भिंगरी लावूनमतदारांच्या घरोघरी जाऊन मतेमागतात. यामध्ये यंदाच्यानिवडणुकीत प्रत्यक्ष संपर्काऐवजीअनेक इच्छुकांना सोशल मिडीयाजवळचा वाटू लागला आहे. असेअसताना सोशल मिडीयावरआ.गणपतराव देशमुख यांचा प्रचारजोरदार सुरू असून त्यांनी केलेलीविकासकामे, संपर्क व स्थानिकप्रश्नांची सोडवणूक सोशलमिडीयाच्या माध्यमातूनशेकापक्षाचे कार्यकर्ते सर्वा...

कष्टकरी जनतेचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी शेकापला भरघोस मते द्या - आ.गणपतराव देशमुख

Image
कष्टकरी जनतेचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी शेकापला भरघोस मते द्या - आ.गणपतराव देशमुख निजामपूर (वार्ताहर) :-शेतकरी कामगार पक्ष हा कष्टकरीजनतेचा पक्ष असून त्या कष्टकरीजनतेचे अनेक प्रश्न, अडचणीमार्गी लावण्यासाठीय े ण ा र्‍ य ाि व ध ा न स भ ानिवडणुकीमध्येशेतकरी कामगारपक्षालाच मतदानकरा, असे आवाहनत ा ल ु क् य ा च ेभ ा ग् य ि व ध ा त ेआ.गणपतराव देशमुख यांनीनिजामपूर येथे प्रचारदौर्‍यानिमित्ताने केले.शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने गावभेट व प्रचार दौर्‍याचेआयोजन करण्यात आले होते.प्रारंभी निजामपूर च्या ग्रामस्थांनीफटाक्यांच्या आतिषबाजीत वढोलताशाच्या गजरातआ.गणपतराव देशमुख यांचेस्वागत केले.प्रास्ताविक भाषणामध्येतानाजी पारसे सर म्हणाले की,आपल्या गावातील600 हेक्टर क्षेत्रटेंभूच्या पाण्यानेअ ा े ि ल त ा ख ा ल ीयेणार आहे.त्यासाठी आत्तापर्यंतअ ा . ग ण प त र ा वदेशमुख यांचेयोगदान मोठे आहे.आजपर्यंत आपण सर्वांनी शेकापला मोठे सहकार्य केले आहे. याहीवेळेस आ.गणपतराव देशमुखयांना मतदान करून सहकार्यकरावे, असे त्यांनी सांगितले.सुतगिरणीचे चेअरमनप्रा.नानासोा लिगाडे म्हणाले की,शेतीच्या पाण्याचे राहिलेले प्रश्नमार्...

बातमी कात्रण

Image
बातमी कात्रण

भविष्यात परिवर्तन होईलच : गणपतराव देशमुख

Image
सांगोला (जि. सोलापूर) तालुक्‍याचे आमदार गणपतराव देशमुख यांच्या विधिमंडळातील कामगिरीस 15 मार्च रोजी पन्नास वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने त्यांच्याशी संवाद साधला. या वेळी त्यांनी या पाच दशकांतील सामाजिक, राजकीय बदल मांडताना आपल्या आठवणींनाही उजाळा दिला...  - विधिमंडळातील तुमच्या कामगिरीस पन्नास वर्षे पूर्ण झाली. तुमच्या राजकीय जीवनाची सुरवात केव्हा झाली?  - माझा जन्म 10 ऑगस्ट 1927चा. माझा स्वातंत्र्यपूर्व काळात विद्यार्थी चळवळीत सहभाग होता. मी 1942च्या सत्यागृहातही होतो. माझं गाव पेण्णूर (सोलापूर). माझं गाव सत्याग्रही तुळशीदास जाधव यांना मानणारं. ते कॉंग्रेसचे. मात्र 1948 मध्ये शेतकरी कामगार पक्षात गेले. त्यांच्याबरोबर गावातले सारेच शेकापमध्ये गेले. मी 1950 ते 56 या कालावधीत पुण्यातून बी.ए. व एलएल.बी. पूर्ण केलं. तिथेही आम्ही विद्यार्थी चळवळ सुरू केली. तिथेच माझ्या व्यापक समाजकारणाचा आणि राजकारणाचा पाया रचला गेला.  - तुमच्या जडणघडणीत कोणाकोणाचा प्रभाव पडला?  त्या वेळी मी मार्क्‍सवादी विचाराने भारावून गेलो. एस. एम. पाटील, शंकरराव मोरे, कमलाताई भागवत, वसंतराव तुळपुळे य...

साखळी सिमेंट नाला बंधा-यामुळे पाण्याची शाश्वत व्यवस्था --- पालकमंत्री प्रा. ढोबळे

Image
सोलापूर :  सांगोला तालुक्यात तयार करण्यात आलेल्या साखळी सिमेंट नाला बंधा-यामुळे पाण्याची शाश्वत व्यवस्था निर्माण झाल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा सोलापूर जिल्हयाचे पालकमंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी केले. लघु पाटबंधारे विभागाव्दारे सांगोला तालुक्यातील तरंगेवाडी येथील साखळी सिमेंट पध्दती नाला बंधा-याचे लोकार्पण पालकंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जि. प. अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी, आ. गणपतराव देशमुख, आ. दिपक आबा साळुंखे पाटील, महिला बालकल्याण अध्यक्षा जयमाला गायकवाड, सांगोला पंचायत समिती सभापती ताई मिसाळ, जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार, उपसचिव श्री. नाथ, कार्यकारी अभियंता श्री. क्षिरसागर आणि जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. गावसाने उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना पालकमंत्री प्रा. ढोबळे म्हणाले की, जिल्हयातील 214 तलावांमधून 115 लक्ष घनमीटर गाळ खाजगी संस्था आणि शासनाने मिळून काढला आहे. तसेच दुष्काळावर कायमस्वरुपी मात करण्यासाठी एकटया सांगोला तालुक्यामध्ये 40 गावांमधून 120 साखळी पध्दती सिमेंट नाला बंधार...

मूर्तीमंत साधे गणपतराव

Image
पांढरा शर्ट ,  पांढरी पँट ,  हातात बॅग असं साधारणपणे जुन्या काळातील गुरुजींशी साधम्र्य असलेलं गणपतराव देशमुख यांचं व्यक्तिमत्त्व पाहिल्यानंतर या माणसाने दहा निवडणुका जिंकल्यात , यावर विश्वास बसत नाही. कारण आमदाराची आजच्या काळातील प्रतिमा खूप वेगळी आहे. राजकारणही खूप झपाटय़ानं बदलतंय. माणसांची मनं आणि मतं बदलताहेत. परंतु या बाजारात बदलले नाहीत ,  ते गणपतराव देशमुख आणि त्यांचा सांगोला मतदारसंघ. तळागाळातल्या माणसांच्या प्रश्नांप्रती असलेली गणपतरावांचीतळमळ कणभरही कमी झालेली नाही.  च्या दुष्काळाचा काळ होता. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सोलापूरला भेट दिली होती. त्यावेळी वसंतराव नाईक वगैरेंच्यासोबत गणपतरावांनी विमानतळावर इंदिराजींची भेट घेतली. दुष्काळाशी संबंधित अनेक मागण्या त्यांनी इंदिराजींकडे केल्या. त्याचवेळी एक मागणी होती ,  समान काम समान दाम अशी. त्यावेळी पुरुषांना तीन रुपये आणि महिलांना अडीच रुपये मजुरी होती. गणतपतरावांनी ती समान करण्याची मागणी केली आणि इंदिराजींनी तिथल्या तिथे ती मंजूर केली. तळमळीचा हाच धागा घेऊन त्यांची वाटचाल आजही सुरू आहे. गणपतरावा...

टँकर तातडीने सुरू करा :आ. गणपतराव देशमुख

Image
सांगोला-पिण्याच्या पाण्याचा प्रश्न शासनाने गांभिर्याने घेतला आहे. यासाठी शासन पैसा खर्च करते, पिण्याच्या पाण्याची जबाबदारी सरपंच-ग्रामसेवकांची असून पाणी टंचाईची एकत्रित पाहणी करून संबंधित अधिकार्‍यांनी टँकरचा प्रस्ताव प्रांताधिकार्‍यांकडे पाठविल्यानंतर एक आठवड्यात टँकर सुरू झाले पाहिजेत, असे आदेश आ. गणपतराव देशमुख यांनी दिले. सांगोला येथे पंचायत समिती बचत भवनात टंचाई आढावा बैठकीत अध्यक्ष पदावरून आ. देशमुख बोलत होते.या  बैठकीस आ. दीपक साळुंखे-पाटील, सभापती ताई मिसाळ, उपसभापती पांडुरंग पांढरे, चंद्रकांत देशमुख, तहसीलदार श्रीकांत पाटील, गटविकास अधिकारी राहुल गावडे, मुख्याधिकारी रमाकांत डाके, पं.स. सदस्या यमगर, सूर्यगण, सुनील चौगुले, सुबराव बंडगर, हणमंत बंडगर, नवनाथ पवार, शहाजी नलवडे, पांडुरंग जाधव आदी उपस्थित होते.पुढे बोलताना आ. देशमुख म्हणाले, जेथे पाणीपुरवठा योजना राबविण्याची गरज आहे, त्या गावामध्ये शौचालय योजना प्राधान्याने राबवावी. ग्रामपंचायतीने गावातील पाणंद रस्ते रोजगार हमीतून येत्या पावसाळ्यापर्यंत करून घ्यावेत. प्रशासनाने छावणी चालकांची ऑगस्ट-सप्टेंबर २0१३ अखेर पर्यंतची ब...

टेंभू, म्हैसाळ, सांगोला कालव्याचे पाणी सांगोला तालुक्याला मिळणार

Image
सांगोला तालुक्यातील शेतीसाठी टेंभू, म्हैसाळ, सांगोला कालवा या योजनेसाठी केंद्र व राज्य शासनातर्फे निधी उपलब्ध होऊ लागले असून त्यातून काही ठिकाणी कामे युद्धपातळीवर चालू आहेत. लवकरच या योजनांचे पाणी तालुक्याला मिळेल. तालुका नंदनवन होईल, असे मत आमदार गणपतराव देशमुख यांनी व्यक्त केले. सांगोला तालुका पंचायत समितीच्या आमसभेत आमदार गणपतराव देशमुख बोलत होते. ते म्हणाले की, तालुक्यात औद्योगिक प्रशिक्षणसंस्था, मुलींचे वसतिगृह, सांगोला न्यायालय यांच्या इमारतीची कामे प्रगतिपथावर आहेत. तर ग्रामीण रुग्णालयास १२ लाख रुपये मंजूर झाले असून विविध पॅथॉलॉजीमधील चार तज्ज्ञ डॉक्टरांची नव्याने नेमणूक झाल्याने आता रुग्णालयात ९ डॉक्टर उपलब्ध आहेत. तसेच इतर सुखसोयीही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आमसभेत २५ मागण्यांचे व अभिनंदनाचे ठराव मंजूर करण्यात आले. त्यामध्ये सांगोला शाखेस केंद्र व राज्य सरकारने १८६ कोटी रुपये मंजूर केले. तेल्या रोग नियंत्रणासाठी सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये मंजूर केल्याबद्दल शरद पवार यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. तर टेंभू योजनेच्या कामाला गती द्यावी, म्हैसाळ योजनेस निधी उपलब...

अर्धशतक

Image
मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने शतकांचे शतक पूर्ण करण्याच्या एक दिवस अगोदर शेतकरी कामगार पक्षाचे विधानसभेतील ज्येष्ठ सदस्य गणपतराव अण्णासाहेब देशमुख यांनी विधिमंडळातील कामकाजाची ५० वर्षे पूर्ण केली.  गणपतरावांना ग्लॅमरचा स्पर्श झालेला नसल्याने त्यांच्या अर्धशतकाची फारशी दखल घेतली गेली नाही. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघातून गणपतराव देशमुख १९६२ साली प्रथम विजयी झाले. मात्र लागलीच १९७२मध्ये काकासाहेब साळुंखे यांच्याकडून गणपतराव पराभूत झाले. पोटनिवडणुकीत राजाभाऊ झपके यांना धूळ चारून गणपतराव पुन्हा विधानसभेत दाखल झाले. त्यानंतर महाराष्ट्रात सेना- भाजपच्या बाजूने हवा वाहत होती तेव्हाचा म्हणजे १९९५चा अपवाद वगळता, गणपतरावांवरच मतदारांनी विश्वास दाखविला आहे. वयाची ८५ वर्षे पूर्ण केलेले गणपतराव विधानसभेत नियमित हजर राहून दिवसभर कामकाजात भाग घेतात. विधानसभेतील सदस्यांचा आक्रस्ताळेपणा कमालीचा वाढला असतानाही जेव्हा गणपतराव बोलायला उभे राहतात तेव्हा सभागृहात नीरव शांतता पसरते. अत्यंत शांत, संयत शब्दात गणपतराव आपला मुद्दा मांडतात. खादीची सफेद पँट व शर्ट परिधान करणारे गणपतराव आपली...

चंदनाचे हात, पायही चंदन!

Image
सध्याचा काळच असा की, आपल्याच नेत्यांचा जनतेला  काडीचा भरोसा वाटत नाही. पांढर्या खादीतल्या कोणालाही हात लावा. भ्रष्टाचाराचं काळं हाताला लागल्याशिवाय राहत नाही. पण आपल्या राज्यात असा एक नेता आहे, ज्याच्यावर राखलेल्या तळ्याचं पाणी चाखल्याचे आरोप करायला कुणी धजावत नाही. या बिनडागी नेत्याचं नाव  गणपतराव देशमुख. त्यांच्या वयाला 85 वर्षे पूर्ण होतायत. त्यानिमित्तानं… हा 84 वर्षांचा तरुण माणूस गेली 10 निवडणुका सतत आमदार म्हणून निवडून येतोय. त्याने राजकारणातले कित्येक उन्हाळे पावसाळे पाहिलेत. ते बोलायला उभे राहिले की विधानसभा स्तब्ध होते. मुख्यमंत्र्यांपासून ते पहिल्यांदाच सभागृहात आलेल्या तरुण आमदारापर्यंत प्रत्येकजण त्यांचं बोलणं लक्षपूर्वक ऐकतो. ते आहेत, सोलापुरातल्या सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख. गणपतरावांच्या राजकीय वाटचालीत गेल्या 50 वर्षांचा महाराष्ट्राचा सामाजिक आणि राजकीय इतिहास सापडतो. गणपतरावांचा जन्म 10 ऑगस्ट, 1927 रोजी मोहोळ तालुक्यातल्या पेनूर या गावातील शेतकरी कुटुंबात झाला. ते पुण्यातून एल.एल.बी. झाले. गणपतरावांची खरी जडणघडण झाली ती पुण्यातच. शिकत असतानाच ते ...

गणपतराव देशमुखांनी रचला राज्यभरात इतिहास

Image
आमदार गणपतराव देशमुख सांगोला - सांगोला मतदारसंघातील शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार गणपतराव देशमुख यांच्या 10 व्या विजयाने महाराष्ट्रात इतिहास घडवला असून विधानसभेत ज्येष्ठ सदस्य म्हणून तालुक्‍याचा नावलौकिक वाढविला आहे तर माजी आमदार ऍड. शहाजी पाटील यांनी पाचवेळा निवडणूक लढविली असून एक वेळाच त्यांना सत्ता मिळवता आली. ही निवडणूक दुरंगी व चुरशीची झाली. मात्र वेळोवेळी आमदार गणपतराव देशमुख यांच्या मतामध्ये घटच झाली आहे. यावेळी सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये शेतकरी कामगार पक्ष व तिसऱ्या आघाडीकडून आमदार गणपतराव देशमुख, कॉंग्रेस पक्षाकडून शहाजी पाटील, जनस्वराज्य पक्षाकडून श्रीकांत देशमुख, सपाकडून नवनाथ देठे, शिवसेना-भाजप व शेतकरी संघटनेकडून बाळासाहेब वाळके व अपक्ष म्हणून ऍड. मच्छिंद्र पाटील यांनी ही निवडणूक लढविली होती. खरी लढत आमदार देशमुख व पाटील यांच्यातच झाली. तालुक्‍यातील 2 लाख 51 हजार 116 मतदारापैकी 1 लाख 82 हजार 963 मतदारांनी व 1035 पोस्टल मतदानाद्वारे मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये आमदार देशमुख यांना 86 हजार 54 मते, माजी आ. पाटील यांना 76 हजार 744 तर श्रीकांत देशमुख...