आमदार गणपतराव देशमुख यांना सामाजिक बांधिलकी समजून पुरोगामी शिक्षक व सेवकसमितीच्या वतीने पाठींबा द्यावा -विनायक कुलकर्णी

 आमदार गणपतराव देशमुख यांना  सामाजिक बांधिलकी समजून पुरोगामी शिक्षक व सेवकसमितीच्या वतीने पाठींबा द्यावा -विनायक कुलकर्णी
सांगोला दि. 20 (प्रतिनिधी):- समाजकारण करतानाभेदभाव नाही, विरोधकांना चांगल्याकामात सहकार्य, स्वत:च्या संस्थान काढता गावोगावच्याकार्यकर्त्यांना संस्था काढण्यासाठी सहकार्य, वयाच्या 88 व्या वर्षीसुध्दा गोरगरीब जनतेसाठीदिवसातील 18-18 तास कामकरणारे, अंधारात प्रकाश देणारा दिवा म्हणून राज्यात ज्यांच्याकडेपाहिले जाते, अशा निष्कलंक,चारित्र्यसंपन्न नेतृत्व असणार्‍याआमदार गणपतराव देशमुख यांनाआपली सामाजिक बांधिलकीसमजून पुरोगामी शिक्षक व सेवकसमितीच्यावतीने पाठींबा द्यावा,असे आवाहन पुरोगामी समितीचेकार्यकारिणी सदस्य विनायककुलकर्णी यांनी केले.शैक्षणिक क्षेत्रातील सर्वघटकांना सातत्याने सहकार्य करणारे,त्यांच्या अडीअडचणी सोडविणारेआ.गणपतराव देशमुख यांनापाठींबा देण्यासाठी पुरोगामीशिक्षक व सेवक समिती सांगोलायांच्यावतीने तालुक्यातीलशिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,संस्था चालक, सदस्या आदींचास्नेहमेळावा काल शनिवारीसांगोला येथे पार पडला. यावेळीउपस्थितांना मार्गदर्शन करतानाश्री.विनायक कुलकर्णी बोलतहोते.समितीचे उपाध्यक्ष फिरोजआतार आपले विचार व्यक्तकरताना म्हणाले, आ.गणपतरावदेशमुख यांचे व्यक्तीमत्व व त्यांचेविचार आमच्यासारख्या शिक्षकांनाआदर्शवत आहेत. त्यांच्याव्यक्तीमत्वाची व विचारांची जाणठेवून आम्ही वाटचाल करीतआहोत. त्यांच्या विचाराची आजगरज आहे. म्हणून आमचा त्यांनापाठींबा आहे, असेही त्यांनी जाहीरकेले.सुपलीचे ज्ञानेश्वर माळीयावेळी आपले विचार व्यक्तकरताना म्हणाले, विकास हाचकार्यक्रम समोर ठेवून कार्य करणारे,ग्रामीण भागातील अगदी शिक्षकबांधवांच्या अडचणी सोडविणारे,ग्रामीण भागातील अगदी वाड्यावस्त्यावरील शेतकरी, शेतमजूरबांधवांच्या अडचणी समजावूनघेऊन त्यांच्यासाठी काम करणारेनेतृत्व म्हणजे आ.गणपतरावदेशमुख. शैक्षणिक क्षेत्रात कार्यकरणार्‍या सर्व घटकांनी त्यांनापाठींबा द्यावा, अशी विनंतीहीशेवटी त्यांनी केली.यावेळी बाबासाहेब करांडेम्हणाले, ऊस तोड कामगारापासूनते प्रशासकीय अधिकारी निर्माणकरणारा शिक्षक आहे. गोरगरीब,कष्टकरी जनतेसाठी संपुर्ण आयुष्यअर्पण केलेले व्यक्तीमत्व म्हणूनज्यांच्याकडे पाहिले जाते, अशाप्रतिभावंत आ.गणपतराव देशमुखयांचे चांगले विचार रूजविण्यासाठीत्यांना आपण सर्वांनी पाठींबा द्यावा,असे आवाहन शेवटी त्यांनी केले.प्रारंभी तालुका अध्यक्षप्रा.संजय शिंगाडे यांनी आपल्याप्रास्ताविकात आ.गणपतरावदेशमुख यांनी सातत्याने शिक्षकांचेप्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केलेआहेत. तरूण पिढीला घडविण्याचेकाम करणारे आणि पुरोगामीविचाराचे असणारे आ.गणपतरावदेशमुख यांना समर्थन देण्यासाठीहा स्नेहमेळावा आयोजीत केलाअसल्याचे सांगितले.

Comments

Popular posts from this blog

आमदार गणपतराव देशमुख व सौ. रतनबााई गणपतराव देशमुख यांनी भोपळे रोडवर शाळेतील मतदानकेंद्रात मतदान केले.

शेतकरी कामगार पक्षाच्यामहिला आघाडीच्याप्रचारास उत्स्फुर्त प्रतिसाद

विकासाच्या मुद्यावर केले जाणारेराजकारण टिकणारे-आ.देशमुख