मी व आ.देशमुख यांनी दुष्काळग्रस्त जनतेला दिलासा देण्याचे काम केले-आ.दिपकआबा

मी व आ.देशमुख यांनी दुष्काळग्रस्त जनतेला
दिलासा देण्याचे काम केले-आ.दिपकआबा
सांगोला (प्रतिनिधी):- मीआणि आ.गणपतराव देशमुखआम्ही दोघांनी स्वत:चे दुकानचालवायला पदे घेतली नाहीत.उपेक्षीत जनतेला मदत करूनत्यांना दिलासा देण्यासाठीआम्ही पदाचा वापर करतो. ऐनदुष्काळात जनावराच्या छावण्याकाढून तालुक्यातील पशुधनवाचविले आहे. आठवड्यालाआढावा बैठक घेऊनदुष्काळग्रस्त जनतेला दिलासादेण्याचे काम केले आहे, असेविचार आ.दिपकआबा साळुंखेपाटील यांनी व्यक्त केले.राष्ट्रवादी कॉंग्रेसपक्ष पुरस्कृतशेकापक्षाचे उमेदवारआ.गणपतराव देशमुख यांच्याप्रचारार्थ सांगोला शहरातीलदोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांसहहितचिंतकांची बैठक सो वारीसायंकाळी सांगोला येथेआयोजीत केली होती. यावेळीआ.दिपकआबा साळुंखे-पाटीलबोलत होते.मी आमदार होण्यामागेशेकापक्षाची महत्वाची भूमिकाअसल्याचे सांगून आमदारदिपकआबा पुढे म्हणाले की,दोन वेळच्या लोकसभेच्यानिवडणूकीत शेकापक्षानेविनाअट पाठींबा दिला होता.जि.प.अध्यक्षपदाची संधीआपल्या पक्षास मिळाली.त्यामध्ये आ.गणपतराव देशमुखयांची भूमिका महत्वाची आहे.यासाठी आणि तालुक्याच्याविकासासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसपक्षाने आ.गणपतराव देशमुखयांना पाठींबा दिला आहे.शेकापक्ष कार्यकर्त्यांनी मोठ्याभावाची भूमिका घेऊनराष्ट्रवादीला लहान भाऊ समजूनदोघांनी मिळून काम करावे.आ.गणपतराव देशमुख यांनाप्रचंड मताधिक्याने निवडूनआणावे, राज्यामध्ये प्रचंडमताधिक्य मिळवून विजयीहोणार्‍या पहिल्या पाच नंबरमध्ये आ.गणपतराव देशमुख यांचा नंबर असला पाहिजे. त्यासाठी दोन्हीपक्षाच्या कार्यकर्त्यांनी आजपासून कामाला लागावे, असे आवाहनहीशेवटी त्यांनी केले.आ.गणपतराव देशमुख यावेली उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शनकरताना म्हणाले की, सूत गिरणीच्या उभारणीनंतर, रूपनर बंधूंनी उभाकेलेल्या उद्योगसमुहानंतर प्रा.डॉ.नवले सर आणि बाबुराव गायकवाडयांनी सुरू केलेल्या शिक्षण संस्थेनंतर सांगोला शहराची झपाट्याने वाढझाली आहे.राज्यामध्ये झपाट्याने वाढ होणार्‍या शहरामध्ये सांगोला शहराचावरचा क्रमांक आहे. सांगोला शहरामध्ये शांततेचे वातावरण आहे.शहरात वाढत असलेली ज्वेलर्सची दुकाने यावरूनसुध्दा शहराचाविकासात वाढ होत असल्याचे लक्षात येते. सांगोला शहरात असलेलीशांतता, सुव्यवस्था आर्थिक भरभराट यावरून शहराचा विकास दिसून येतो. शहराच्या विकासात नागरीकांचा मोठा असल्याचेही त्यांनीसांगितले.मागच्या सर्व निवडणूकीत शहरात कधीही कमी मते मिळालीनाही. आता तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पाठींबा असल्याने आपणासविक्रमी मताधिक्य मिळणार आहे. त्यासाठी आपण सातव्या क्रमांकावरअसलेल्या गाडीच्या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताधिक्यानेविजयी करावे, अशी विनंतीही आ.देशमुख यांनी केली.यावेळी राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते बाबुराव गायकवाड यांनी कार्यकर्त्यांनीजागृत राहून प्रचार करावा. दोन पक्ष एकत्र आल्याने नुसते निवडूनयेऊन काही उपयोग नाही तर आ.गणपतराव देशमुख यांना विक्रमीमताधिक्य मिळाले पाहिजे, त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नकरावे.यावेळी ऍड.शंकर सरगर, महादेव कांबळे यांनी मनोगत व्यक्तकेले. प्रास्तावीक ऍड.भारत बनकर यांनी तर आभार चंद्रकांत देशमुखयांनी मानले. या बैठकीस शेकापक्ष आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहरकार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आमदार गणपतराव देशमुख व सौ. रतनबााई गणपतराव देशमुख यांनी भोपळे रोडवर शाळेतील मतदानकेंद्रात मतदान केले.

शेतकरी कामगार पक्षाच्यामहिला आघाडीच्याप्रचारास उत्स्फुर्त प्रतिसाद

विकासाच्या मुद्यावर केले जाणारेराजकारण टिकणारे-आ.देशमुख