Popular posts from this blog
चंदनाचे हात, पायही चंदन!
By
.
-
सध्याचा काळच असा की, आपल्याच नेत्यांचा जनतेला काडीचा भरोसा वाटत नाही. पांढर्या खादीतल्या कोणालाही हात लावा. भ्रष्टाचाराचं काळं हाताला लागल्याशिवाय राहत नाही. पण आपल्या राज्यात असा एक नेता आहे, ज्याच्यावर राखलेल्या तळ्याचं पाणी चाखल्याचे आरोप करायला कुणी धजावत नाही. या बिनडागी नेत्याचं नाव गणपतराव देशमुख. त्यांच्या वयाला 85 वर्षे पूर्ण होतायत. त्यानिमित्तानं… हा 84 वर्षांचा तरुण माणूस गेली 10 निवडणुका सतत आमदार म्हणून निवडून येतोय. त्याने राजकारणातले कित्येक उन्हाळे पावसाळे पाहिलेत. ते बोलायला उभे राहिले की विधानसभा स्तब्ध होते. मुख्यमंत्र्यांपासून ते पहिल्यांदाच सभागृहात आलेल्या तरुण आमदारापर्यंत प्रत्येकजण त्यांचं बोलणं लक्षपूर्वक ऐकतो. ते आहेत, सोलापुरातल्या सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख. गणपतरावांच्या राजकीय वाटचालीत गेल्या 50 वर्षांचा महाराष्ट्राचा सामाजिक आणि राजकीय इतिहास सापडतो. गणपतरावांचा जन्म 10 ऑगस्ट, 1927 रोजी मोहोळ तालुक्यातल्या पेनूर या गावातील शेतकरी कुटुंबात झाला. ते पुण्यातून एल.एल.बी. झाले. गणपतरावांची खरी जडणघडण झाली ती पुण्यातच. शिकत असतानाच ते ...
Comments
Post a Comment