अपक्ष उमेदवार प्रा. लक्ष्मण हाके यांचा आमदार देशमुख यांना पाठिंबा जाहीर

अपक्ष उमेदवार प्रा. लक्ष्मण हाके यांचा आमदार देशमुख यांना पाठिंबा जाहीर
सांगोला दि. 8 (सा.वा.) ः-धनगर समाज आरक्षणाच्या मुद्यावर लढा देण्यासाठी विधानसभेत धनगर समाजाचे जास्तीत जास्त प्रतिनिधी जाणे आवश्यक आहे. त्याचबरोबर स्वहितापेक्षा तालुक्यातील जनतेच्या हितासाठी आपण निवडणूकीतून माघार घेत आमदार गणपतराव देशमुख यांना पाठिंबा दिल्याची माहिती अपक्ष उमेदवार प्रा. लक्ष्मण हाके यांनी दिली आहे.
सांगोला विधानसभा निवडणूकीसाठी शेकापचे आमदार गणपतराव देशमुख, शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील, भाजपाचे श्रीकांत देशमुख, कॉंग्रेसचे जगदीश बाबर यांच्यासह 15 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. अपक्ष उमेदवार प्रा. लक्ष्मण हाके यांनी निवडणूकीच्या प्रचाराला जोरदार सुरुवात केली होती. त्यांनी पश्चिम भागातील जुनोनी, कोळा, चोपडी, शिवणे, भाळवणी गटातील कांही गावात जाऊन प्रचारसभाही घेतल्या होत्या. प्रा. लक्ष्मण हाके यांनी निवडणूकीतून माघार घ्यावी व आमदार देशमुख यांना पाठिंबा द्यावा याकरिता धनगर समाजातील कांहीजण गेल्या चार दिवसांपासून प्रयत्नात होते. दरम्यान उमदेवार प्रा. लक्ष्मण हाके व समाजातील नेत्यांमध्ये चर्चा होऊन अखेर काल बुधवारी प्रा. हाके यांनी आपण आमदार गणपतराव देशमुख यांना पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. प्रा. लक्ष्मण हाके यांनी आमदार गणपतराव देशमुख यांना पाठिंब्याचे पत्र दिले. यावेळी चंद्रकांत देशमुख, बिरुदेव शिंगाडे आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आमदार गणपतराव देशमुख व सौ. रतनबााई गणपतराव देशमुख यांनी भोपळे रोडवर शाळेतील मतदानकेंद्रात मतदान केले.

शेतकरी कामगार पक्षाच्यामहिला आघाडीच्याप्रचारास उत्स्फुर्त प्रतिसाद

विकासाच्या मुद्यावर केले जाणारेराजकारण टिकणारे-आ.देशमुख