आ.गणपतराव देशमुख यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करून इतिहास घडवावा -आ.दिपकआबा

आ.गणपतराव देशमुख यांना विक्रमी मताधिक्याने
विजयी करून इतिहास घडवावा
-आ.दिपकआबा

महुद येथे प्रचंड बैलगाडी रॅली व प्रचारसभा संपन्न
महुद :-मागच्या तीन-चार वर्षाच्या काळातदुष्काळी परिस्थिती असतानाआम्ही दोघांनी गावोगावी छावण्याकाढून पशुधन वाचविले.दुष्काळात शेतकर्‍यांना दिलासादेण्याचे काम केले. टेंभू-म्हैसाळचेपाणी बुध्देहाळ तलावात व कोरडानदीत आले आहे. आता हे पाणीआपल्या शेतकरी बांधवांच्याशेतामध्ये न्यावयाचे आहे. त्यासाठीराष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत शेकापक्षाचेअधिकृत उमेदवार आ.गणपतरावदेशमुख यांना विक्रमी मताधिक्यानेविजयी करून राज्यात इतिहासघडवावा, असे आवाहनआ.दिपकआबा साळुंखे-पाटीलयांनी केले.आ.गणपतराव देशमुख यांच्याप्रचारार्थ महुद येथे काल शनिवारीआयोजीत केलेल्या प्रचारसभेतआ.दिपकआबा बोलत होते.यावेळी व्यासपीठावर आ.गणपतराव देशमुख, बाबुरावगायकवाड, भाऊसाहेब रूपनर,चंद्रकांत देशमुख, पांडुरंग पांढरे,डॉ.दादासाहेब जगताप, शहाजहानमुलाणी, बाळासाहेब ढाळे, विजयकोळेकर, सुनिल बाबर, वसंतरूपनर, राहुल काटे, शिवाजीशेजाळ, यशवंत चव्हाण, मच्छिंद्रखरात, भिमराव बागल, अंगदजाधव, ऍड.धनंजय मेटकरी,ऍड.मारूतीराव ढाळे, बाबा करांडे,ऍड.शंकर सरगर, संजय हाके-पाटील,सभापती सौ.सुरेखासुर्यागण, सुरज बनसोडे, नागेशजोशी आदी मान्यवर उपस्थित होते.सभेच्या प्रारंभी गावातून प्रचंडप्रमाणात रॅली काढण्यात आली. यारॅलीमध्ये बैलगाडी, मोटार सायकलीमोठ्या संख्येने सामील झाले होते.महुद परिसरामध्ये मोठ्या प्रमाणातनिघालेल्या या रॅलीबद्दल संपुर्णसभास्थानी एकच चर्चा चालू होती.मी आणि आ.गणपतरावदेशमुख आम्ही दोघांनी सातत्याने,उपेक्षीतांना दिलासा देण्याचे कामकेले आहे. आता तुच्याकडे मतेमागायला येणारी मंडळी दुष्काळीपरिस्थिती असताना कुठे गेली होती? याउलट विरोधकांनीविकासासाठी काहीच केले नसूनत्यांना सामाजिक बांधीलकीहीनाही.असे सांगून आ.दिपकआबासाळुंखे-पाटील पुढे म्हणाले,मागच्या 17 वर्षापासून तालुक्यातशेकापक्ष आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसयांच्यात आघाडी आहे. माझ्याविधानपरिषदेच्या, मागच्या दोनवेळच्या लोकसभेच्या निवडणुकीतआणि कालच्या जिल्हा परिषदेच्याअध्यक्षपदाच्या निवडणुकीतआ.गणपतराव देशमुख आणिशेकापक्ष यांचे महत्वाचे योगदान वसहकार्य मिळाले आहे. त्यामुळेदोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनीमतदारांच्या घरोघरी जाऊनआ.गणपतराव देशमुख यांचेगाडीचे चिन्ह समजावून सांगावे.जेणे करून आ.गणपतराव देशमुखयांना एवढे मताधिक्य मिळालेपाहिजे की, राज्यातील विक्रमीमताधिक्य मिळविणार्‍या पहिल्यापाच विजयी उमेदवारांमध्येआ.गणपतराव देशमुख यांचा नंबरअसला पाहिजे, असेही आवाहनत्यांनी केले.आ.गणपतराव देशमुखयावेळी म्हणाले, मागच्या 52वर्षाच्या कालावधीत जनतेनीमाझ्यावर अपार प्रे करून मलादहावेळा आमदार केले. 2 वेळा मंत्री केले, या कालावधीत मी माझ्या परीने काम केलेआहे. तालुक्यामधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नसोडविला आहे. शेतीसाठी टेंभूचे पाणी कोळा मार्गेबुध्देहाळ तलावात, म्हैसाळचे पाणी कोरडा नदीच्यापात्रातून वाढेगाव बंधार्‍यापर्यंत तर निरा उजवाकालव्याचे पाणी माण नदीत आले आहे. आता हेपाणी येत्या काही महिन्यात आपणासशेतकर्‍यांच्या शेतात न्यावयाचे आहे. निरा उजवाकालव्यातून टेल टू हेड पाणी मिळावे, यासाठीयशस्वी संघर्ष केला. सर्वच कामे मार्गी लागलीआहेत. असा दावा करणार नाही. मी वआ.दिपकआबा आमच्या दोघांच्या प्रयत्नातूनअपुर्‍या योजना, अपुरी कामे मार्गी लावण्यासाठीकाम करणार आहोत. त्यासाठी आपण मला प्रचंडमताधिक्यांनी निवडून द्यावे, अशी विनंतीही त्यांनीकेली. आजचा मेळावा व रॅली बघून मी माझेवय विसरून गेलो असल्याचे त्यांनी सांगितले.आरपीआयचे तालुका अध्यक्ष सुरज बनसोडेम्हणाले की, गेली साठ वर्षे गणपतराव देशमुख हे तालुक्याचे अधिकृत उमेदवार आहेत.महायुतीमध्ये जरी आरपीआय असला तरी आम्हीयेथे शेकापला पाठिंबा दिला आहे. दलित, मुस्लीम यांच्यासाठी आ.देशमुख यांनी मोठेयोगदान दिले आहे. दुष्काळी तालुकाम्हणून राज्यभर ओळख असणार्‍या सांगोलातालुक्यात आजपर्यंत एकाही शेतकर्‍यांने आत्महत्याकेली नाही, यामागे आ.गणपतराव देशमुख यांचेकुशल नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले.प्रारंभी ऍड.मारूतीराव ढाळे यांनीप्रास्तावीकात गावातील वाड्या-वस्त्यावरील सर्वकार्यकर्ते एकत्रीत काम करून महुद गटातूनविक्रमी मताधिक्य आ.गणपतराव देशमुख यांनामिळवून देऊ, अशी ग्वाही दिली.यावेळी सभापती सौ.सुरेखासुर्यगण, चंद्रकांतदादा देशमुख,प्रा.लक्ष्मण हाके, संजय हाके-पाटील,सुरज बनसोडे, नागेश जोशी,ऍड.महादेव कांबळे, ऍड.शंकररावसरगर, प्रा.माणिकराव पाटील, रहिमशेख, निलेश सरतापे, निलेश चव्हाण,उत्तम जरे, महादेव शिनगारे, उद्धवसरतापे, परमेश्वर कोळेकर, प्रा.जनार्दन नागणे,नारायण कांबळे, लिंगराज येडगे, श्रावण वाक्षेआदींनी आपले विचार व्यक्त करून आ मदारगणपतराव देशमुख यांना विक्रमी मताधिक्यानेविजयी करावे, अशी विनंती केली.या सभेस मोठ्या संख्येने ग्रामस्थ, महिलाव युवक वर्ग उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आमदार गणपतराव देशमुख व सौ. रतनबााई गणपतराव देशमुख यांनी भोपळे रोडवर शाळेतील मतदानकेंद्रात मतदान केले.

शेतकरी कामगार पक्षाच्यामहिला आघाडीच्याप्रचारास उत्स्फुर्त प्रतिसाद

विकासाच्या मुद्यावर केले जाणारेराजकारण टिकणारे-आ.देशमुख