आमदार गणपतराव देशमुखांचा 11 व्या वेळी विधानसभेत प्रवेश



आमदार गणपतराव देशमुखांचा 11 व्या वेळी विधानसभेत प्रवेश
सांगोला - सांगोला विधानसभा निवडणूकीत अखेर 87 वर्षीय विद्यमान आमदार गणपतराव देशमुख यांनी विरोधकांना चारी मुंड्या चित करत बाजी मारली, आणि 11 व्या वेळी विधानसभेत प्रवेश मिळविला. त्यांनी शिवसेनेचे शहाजीबापू पाटील यांचा 25 हजार 224 मतांनी पराभव केला.
13 व्या विधानसभा निवडणूकीसाठी आमदार गणपतराव देशमुख यांनी अर्ज भरल्यापासूनच कार्यकर्त्यांनी यावेळीही आमदारसाहेबांना निवडून आणून इतिहास घडवायचाच असा निर्णय घेतला होता. भाजपाच्या भगव्या लाटेत सांगोल्याचा गड राखण्यात शेकाप,राष्ट्रवादी व इतर पाठींबा दिलेल्या मित्रपक्ष कार्यकर्त्यांना अखेर यश आले. आमदार गणपतराव देशमुख यांनी आपले पारंपारिक प्रतिस्पर्धी शिवसेनेचे शहाजीबापू पाटील यांचा 25 हजार 224 मतांनी पराभव करत अजून आपण ‘‘तंदुरुस्त’’ आहोत, हे सिध्द केले आहे. शिवसेनेचे शहाजीबापू पाटील वगळता इतर सर्वांचे डिपॉझिट जप्त होणार आहे.
 उमेदवार व त्यांना मिळालेली मते अशी आहेत -जगदीश बाबर (कॉंग्रेस) 3,457  , श्रीकांत देशमुख (भाजपा) - 14,074, बनसोडे मिलींद रेवण (बसपा) 2,323, ऍड. शहाजीबापू पाटील (शिवसेना) 69,150, कमरुद्दीन काझी (बहुजन मुक्ती पार्टी )1317, तुकाराम शेंडगे (हिदुस्थान प्रजा पक्ष) 909, गणपतराव देशमुख (शेकापक्ष) 94374, संभाजी आलदर (अपक्ष) 7444, नामदेव लवटे (अपक्ष) 902, परमेश्वर गेजगे 597, मच्छिंद्र पाटील (अपक्ष) 475, नवनाथ मदने (अपक्ष) 684, मोहन राऊत (अपक्ष) 872, लक्ष्मण हाके (अपक्ष) 527, सचिन घाडगे (अपक्ष) 315 आणि नोटा 666
पहिल्या सहा फेर्‍यापर्यंत शिवसेनेचे शहाजीबापू पाटील आघाडीवर होते. परंतु सातव्या फेरीनंतर गणपतराव देशमुखांनी घेेतलेली आघाडी कमी झाली नाही. आमदार गणपतराव देशमुखांचा विजय जाहीर होताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत विजयाचा आनंद लुटला. 11 व्या वेळी विधानसभेत जाताना मोठा आनंद होतो आहे, येत्या पाच वर्षात अपूर्ण राहिलेल्या जलसिंचन योजना पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करु अशी प्रतिक्रिया गणपतराव देशमुख यांनी दिली.

Comments

Popular posts from this blog

आमदार गणपतराव देशमुख व सौ. रतनबााई गणपतराव देशमुख यांनी भोपळे रोडवर शाळेतील मतदानकेंद्रात मतदान केले.

शेतकरी कामगार पक्षाच्यामहिला आघाडीच्याप्रचारास उत्स्फुर्त प्रतिसाद

विकासाच्या मुद्यावर केले जाणारेराजकारण टिकणारे-आ.देशमुख