Posts

Showing posts with the label Vikas

टेंभू, म्हैसाळ, सांगोला कालव्याचे पाणी सांगोला तालुक्याला मिळणार

Image
सांगोला तालुक्यातील शेतीसाठी टेंभू, म्हैसाळ, सांगोला कालवा या योजनेसाठी केंद्र व राज्य शासनातर्फे निधी उपलब्ध होऊ लागले असून त्यातून काही ठिकाणी कामे युद्धपातळीवर चालू आहेत. लवकरच या योजनांचे पाणी तालुक्याला मिळेल. तालुका नंदनवन होईल, असे मत आमदार गणपतराव देशमुख यांनी व्यक्त केले. सांगोला तालुका पंचायत समितीच्या आमसभेत आमदार गणपतराव देशमुख बोलत होते. ते म्हणाले की, तालुक्यात औद्योगिक प्रशिक्षणसंस्था, मुलींचे वसतिगृह, सांगोला न्यायालय यांच्या इमारतीची कामे प्रगतिपथावर आहेत. तर ग्रामीण रुग्णालयास १२ लाख रुपये मंजूर झाले असून विविध पॅथॉलॉजीमधील चार तज्ज्ञ डॉक्टरांची नव्याने नेमणूक झाल्याने आता रुग्णालयात ९ डॉक्टर उपलब्ध आहेत. तसेच इतर सुखसोयीही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आमसभेत २५ मागण्यांचे व अभिनंदनाचे ठराव मंजूर करण्यात आले. त्यामध्ये सांगोला शाखेस केंद्र व राज्य सरकारने १८६ कोटी रुपये मंजूर केले. तेल्या रोग नियंत्रणासाठी सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये मंजूर केल्याबद्दल शरद पवार यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. तर टेंभू योजनेच्या कामाला गती द्यावी, म्हैसाळ योजनेस निधी उपलब...